आतापर्यंत लेक वाचवा लेक शिकवा हा संदेश देण्यासाठी पतपेढीच्या सभासद कन्येसाठी कन्यादान योजना राबविण्यात येते. परंतु मुली बरोबर मुलाच्या विवाह प्रित्यर्थही अशी योजना राबवावी अशी मागणी सभासदांकडून होत होती. या मागणीचा आदर राखून सभासदाच्या एका कन्येला विवाहप्रित्यर्थ ज्याप्रमाणे रु. ५५५५/- रकमेचा धनादेश देऊन कन्यादान योजना राबविण्यात येते त्याब प्रमाणे एका मुलाकरिताही आहेरमान योजना दि. १/१२/२०२३ पासून सुरु करण्यात येत आहे. एक मुलगा व एक मुलगी किंवा दोन्ही मुली किंवा दोन्ही मुले असली तरीही एका सभासदास एका अपत्यासाठी कन्यादान/आहेरमान या योजनेचा लाभ मिळेल. कन्यादान / आहेरमान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे जोडावीत.
१) भरलेला छापील अर्ज.
२) रेशनिंग कार्ड झेरॉक्स
३) सभासद पाल्याचे आधार कार्ड व पॅनकार्ड झेरॉक्स
४) लग्नपत्रिका