स्व.वसंतराव बापट सरांनी शिक्षक शिक्षकेतरांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी विद्यासेवक पतपेढीचे बीज रोविले. अभ्यासू, शिक्षक व शिक्षकेतरांप्रती सेवाभाव बाळगणारे आदरणीय श्री.जयंतराव ओक सर व श्रद्धास्थान श्री.रामनाथ मोते सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभापासूनचे संचालक मंडळ सभासद हीत जोपासत कार्यरत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी ही नामंकित पतपेढी सभासद कल्याणाच्या अनेक योजना राबवित आहे. या योजनांबद्दल अधिकाधिक सभासदांना माहिती व्हावी व त्या योजनांचा सभासदांना लाभ व्हावा या हेतूने सभासदांशी हितगुज साधताना पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष श्री सुधीर घागस अर्थात सभासदांच्या हक्काचा माणूस सुधीरभाऊ.