*अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना* सन 2019-2020
सन्मानीय सभासद, ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी लि.ठाणे-पालघर या पतसंस्थेची 42 वीअधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.28/03/202 रोजी सकाळी 10 वा. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. सुधीर देवराम घागस यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्देशानुसार व्हिसी किव्वा ओएव्हिम या माध्यमाद्वारे ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर सभेस सर्व सन्मानीय सभासदांनी सहभागी व्हावे ही विनंती.
सभेपुढील विषय-:
1-: मागील दि.14/07/2019 रोजी झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
2-: संचालक मंडळाने तयार केलेल्या सन 2019-2020 या वर्षातील कामकाजाचा वार्षिक अहवाल, संचालक मंडळाने शिफारस केलेला ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजूर करणे.
3-: दि.31/03/2020 अखेर संस्थेस झालेल्या नफ्यास आणि संचालक मंडळाने मंजूर केलेल्या नफा विभागणीस व लाभांश वितरणास कार्योत्तर मंजुरी देणे (संदर्भ संचालक मंडळ सभा दि.25/09/2020 ठराव क्र.19 अन्वये)
4-: सन 2019-2020 च्या वैधानिक लेखा परीक्षकांच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेऊन स्वीकृत करणे, तसेच मागील लेखापरीक्षण दोष-दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.
5-: संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2020-2021 या वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे.
6-: सन 2020-2021 सालासाठी अंतर्गत तसेच शासनमान्य तालिकेवरून वैधानिक लेखा परीक्षकाच्या केलेल्या नेमणूकीस कार्योत्तर मंजुरी देणे. (संदर्भ संचालक मंडळ सभा दि.25/09/2020 ठराव क्र.18 अन्वये)
7-: कोरोना महामारी आजाराने मयत सभासदांना विद्यासेवक ऋणमुक्ती व स्व.वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजनेतून ऋणमुक्ती लाभ देण्यास मंजुरी देणे.
8-: निबंधकास सादर केलेल्या व करावयाच्या आर्थिक विवरण पत्रांची नोंद घेणे.
9-:वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत करणे.
10-: मा.अध्यक्षाच्या परवानगीने येणारे ऐनवेळचे विषय.
स्थळ-: कल्याण (प)
दिनांक-:15/03/2021
श्री.सुधीर देवराम घागस (अध्यक्ष)
प्रा. रमेश दुदांजी बुटेरे (कार्यवाह)
विद्यासेवक पतपेढी संचालक मंडळ
सूचना – ऑनलाईन सभेची लिंक अध्यक्ष मनोगतामध्ये दिलेली आहे याची नोंद घ्यावी *
सभेस जाॅईन होणाऱ्या सदस्यांनी शनिवार दि.२७ मार्च २०२१ पर्यंत आपल्या शाखा कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अथवा फोन करून नोंदणी करावी ही विनंती.