विद्यासेवक पतपेढी, ठाणे-पालघर या पतसंस्थेचे माजी सल्लागार व माजी शिक्षक आमदार स्व.रामनाथ मोते यांचा जन्मदिवस पतपेढीच्यावतीने दरवर्षी ‘आरोग्य संदेश दिन’ म्हणून साजरा केला जातो.यावर्षी श्रीरामनवमी दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता “आरोग्याचा अधिकार” या विषयावर डाॅ.विवेक कोरडे यांचे झूम ॲपवर आॅनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. पतपेढीच्या जास्तीत जास्त सदस्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी व्हाॅट्ॲपवर दिल्या जाणाऱ्या लिंकद्वारे सहभागी व्हावे असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी केले आहे.