Our Schemes
ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी आकर्षक योजना

स्व. रामनाथ दादा मोते ऋणमुक्ती योजना

* स्व. रामनाथ दादा मोते ऋणमुक्ती योजना (नापरतावा) :-

योजनेचे नांव : स्व. रामनाथ दादा मोते ऋणमुक्ती योजना.

योजना प्रारंभ : श्रीराम नवमी (२५ मार्च २०१८)

या योजनेअंतर्गत दि. ०१/१०/२०१९ पासून सर्व साधारण कर्जासाठी नापरतावा रक्कम घेण्यात येत आहे. अहवाल वर्षाच्या सुरुवातीस १६३५ सभासदांकडून रक्कम रु. ९६,७८,८६३/- जमा होती. ४९२ कर्जदार सभासदांकडून, अहवाल वर्षात २% नापरतावा रु. १,६०,१२,७००/- योजने अंतर्गत जमा झाली. अहवाल वर्षात मयत ८ सभासदांना रु. ६३,०३,१६२/- एवढे रकमेचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे. यामुळे मयत सभासदाचे वारसदारांना दिलासा देऊन जामिनदारांना जामिनातून मुक्त करण्यात आले.

पहिलाय वर्षी ही योजना प्रायोगिक तत्वावर होती, कोविडपूर्वी ऋणमुक्तीपोटी केवळ १% रक्कम घेतली जात होती. कोविडमध्ये मृतांचे प्रमाण वाढल्याने परतावा रक्कमही परत देण्यात आली. त्यामुळे या योजनेपोटी कमी रक्कम शिल्लक राहीली. त्यामुळे ही योजना अल्प बदल करुन सुरु ठेवली आहे. ज्यामुळे कर्जदार सभासदांच्या वारसांना मोठा दिलासा मिळत आहे. योजने पोटी घेतलेली रक्कम १% परतावा ऐवजी २% ना परतावा करावी लागली.

वरीलप्रमाणे ऋणमुक्ती देऊन या योजनेअंतर्गत वर्षाअखेरीस रु. १,९३,८८,४०१/- रक्कम जमा आहे. यात २१२७ कर्जदार सभासदांची जोखीम संस्थेवर आहे. लाभार्थी सभासद/वारसदार यांची यादी अहवालात छापली आहे.

अहवाल वर्षात मयत सभासदांच्या वारसांना कर्ज संरक्षण योजना लाभ व ऋणमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी पत्रे वितरण शाखा निहाय पतपेढी कार्यालयामध्ये करण्यात आले. पदाधिकारी व स्थानिक संचालकांच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले.

ऋणमुक्ती योजने अंतर्गत योजना प्रारंभापासून ३१ मार्च २०२४ पर्यंत ४४ मयत सभासदांना रु. २,९४,००,६९९/- एवढ्या रकमेची ● ऋणमुक्ती देण्यात आलेली आहे. •

स्व. श्री. वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजना

* स्व. श्री. वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजना – निधी लाभ :-

पतसंस्थेने गेल्या १३ वर्षांपासून सुरु केलेल्या कर्ज संरक्षण योजनेत पतपेढीच्या बहुतांश सभासदांनी सहभाग घेतला आहे. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. या योजनेतून पतपेढीने अहवाल वर्षात १३

सभासदांना ३९,००,०००/- रुपयाचा लाभ दिलेला आहे. अहवाल वर्षाच्या सुरुवातीस निधीची रक्कम रु. ९,९९,४५,०५२/-

इतकी जमा होती. अहवाल वर्षात वसुल झालेली वर्गणी व प्रत केलेली वर्गणी, अहवाल वर्षात दिलेले क्लेम वजा जाता रु. १०,६२,१०,४५२/- इतकी रक्कम या निधी योजनेत वर्षाअखेरीस जमा आहेत. अहवाल वर्षात या योजने अंतर्गत क्लेम दिलेल्या मयत सभासदांच्या नावांची यादी व तक्ता अहवालात छापलेला आहे.

या अहवाल वर्षाअखेर पर्यंत योजना सुरु झाल्यापासून २४६ सभासदांच्या वारसांना रु. ५,८४,००,०००/- रकमेचा लाभ पतपेढीकडून देण्यात आलेला आहे.

ज्या शाळा/महाविद्यालयातील सभासद या योजनेत सहभागी नसतील वा कर्ज संरक्षण वर्गणी दरमहा रु. ३००/- पेक्षा कमी कपात करत असतील त्यांना नम्र विनंती आहे की, आपण सर्वांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या आर्टिकल कर्जाची रक्कम या योजनेद्वारे संरक्षीत करावी

विद्यासेवक ऋणमुक्ती ठेव योजना

* विद्यासेवक ऋणमुक्ती ठेव योजना (परतावा स्वरुपाची) :-

या योजने अंतर्गत रु. १,३६,७०,०१०/- एवढी रक्कम ऋमुक्ती ठेव केलेली योजनेत ८१० सभासदांकडून जमा होती. अहवाल वर्षात सेवानिवृत्त ४५२/- होऊन व कर्ज परतफेड झालेल्या ७६ सभासदांना ऋणमुक्ती ठेव रु. बल वर्षात १४,१०,५००/- परत केलेली आहे. अहवाल वर्षाअखेर विद्यासेवक ऋणमुक्ती ठेव म्हणून रु. १,२२,५९,५१०/- एवढी रक्कम परतावा स्वरुपाची जमा आहे. सध्या या योजनेत सर्वसाधारण ७३४ कर्जदार सभासद सहभागी आहेत.

भाग-वर्गणी कपाती बाबत

माहे डिसेंबर २०२३ पेड इन जानेवारी २०२४ या वेतन देयकामध्ये पतपेढी भाग-वर्गणी कपातीची मर्यादा वाढविण्यात आली असून धाग रु. ५००/-, वर्गणी रु. १५००/- वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजना वर्गणी रु. ३००/- व मृत्यु फंड योजना वर्गणी रु. १००% असे एकूण २४००/- व त्याबरोबर सभासद कर्जदार असल्यास कर्जाचा हप्ता त्यामध्ये मिळवून कपात करण्यात यावी.

विद्यासेवक कन्यादान योजना व आहेरमान योजना :-

अहवाल वर्षात विद्यासेवक कन्यादान योजनेसाठी सन २०२२-२३ च्या नफ्यातून. ५,५५,०००/- कन्यादान रक्कम काढण्यात आली होती. मागील कन्यादान निधी रु. २,७७,७५०/- जमा होती असे एकूण ८,३३,२५०/- एवढी रक्कम शिल्लक होती. अहवाल वर्षात ६३ सभासदांच्या कन्यांना रु. ३,४९,९६५/- व सभासदांच्या ९ मुलांना आहेरमान योजने अंतर्गत रु. ४९,९९५/- असे एकूण रु. ३,९९,९६०/- एवढी रक्कम वितरीत करण्यात आली. अहवाल वर्षाअखेर रु. ४,३३,२९०/- शिल्लक आहे.

योजना सुरु झाल्यापासून ३१ मार्च २०२४ अखेर ३०५ सभासदांच्या कन्यांना रु. १६,९४,२७५/- व आहेरमान योजने अंतर्गत ९ सभासदांच्या मुलांना रु. ४९,९९५/- या योजने अंतर्गत देण्यात आलेले आहेत.